१९६१ मध्ये स्थापन झालेली TAFE( टीएएफई) ही अॅमॅल गमेशन्स समूहाची आघाडीची कंपनी असून आज ती जगातील जगातील ट्रॅक्टर बनवणार्या मोठ्या कंपन्यांमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. तर भारतात दुसर्या क्रमांकावर असून ट्रॅक्टर निर्यात करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. टीएएफई ने आपल्या दर्जेदार आणि वापरण्यासकिफायशीरउत्पादनांच्या वैविध्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
तंत्रज्ञान सतत पुढच्या पातळीवर घेऊन जाणं आणि कामगिरी मधला उच्चतम दर्जा राखणं ही मॅसीच्या स्थापनेपासूनची कथा आहे. सतत नवीन बदल घडवून आणत मॅसी विविध प्रकारच्या ट्रॅक्टरची श्रेणी उपलब्ध करून देते.हे ट्रॅक्टर शेतीतील अवजारे आणि सामान वाहून नेणे या दोन्ही बाबतीत उच्च कामगिरी बजावतात.